मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्याचं आमिष, महिलेवर वारंवार अत्याचार; जळगाव हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्याचदरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील दर्डा कॉलनी परिसरातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहजळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील दर्डा कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार काल रविवारी रात्री १ वाजता समोर आला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील दर्डा कॉलनी परिसरातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. सुरेश त्र्यंबक पाटील (रा. कांचन नगर, जळगाव) याने महिलेला घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी पैसे देतो आणि मुलांना चांगल्या शाळेत शिकविण्याचे आमिष दाखवत महिलेवर सप्टेंबर २०२३ मध्ये अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत महिलेने रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश त्र्यंबक पाटील (रा. कांचन नगर, जळगाव) याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default