धक्कादायक! माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर लॉजवर नेऊन अत्याचार

फुले शाहू आंबेडकर
0
तिन्ही पीडितांनी याची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ तिन्ही संशयितांना अटक केली आहे.
आटपाडी : माध्यमिक शाळेत  शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना तिघा तरुणांनी फिरायला जाऊ असे सांगून लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनेची आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल असून गुन्हा दाखल केला आहे.
पांडुरंग हनुमंत यमगर (वय २० बनपुरी), किरण बाळासाहेब शेंडगे (२०, शेंडगेवाडी) आणि शुभम यमगर (२०, बनपुरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, पीडित तिन्ही मुलीची अल्पवयीन आहेत. या मुली माध्यमिक शिक्षण घेतात, तर संशयित महाविद्यालयीन शिक्षण घेतात. ते तिघे मित्र आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तिघेही आरोपी पीडित मुलींच्या मागावर होते. त्यांना अडवणे आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार घडले होते. हा प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी संबंधित मुलांना समज दिली होती. पुन्हा २७ डिसेंबरला या तरुणांनी मुलींना आटपाडी ओढापात्रात गाठून भीती दाखवली. तसेच फिरायला जाऊ असे सांगून तिन्ही मुलींना गाडीवर बसवून घेऊन गेले.
कौठुळी रोडवरील बारच्या लॉजवर घेऊन गेले. तिथे मुली भयभीत झाल्या. तिथे भयभीत मुलींना धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलीनी पालकांना सांगितल्यानंतर उजेडात आला. तिन्ही पीडितांनी याची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ तिन्ही संशयितांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default