शिरपूर:- क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त येथील बापुजी युवा फाऊंडेशन वरवाडे शिरपूर यांच्या वतीने स्री जन्माचे भव्य स्वागत, करण्यात आले. आज ३ जानेवारी रोजी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालया दाखल करण्यात आलेल्या किस्मत नगरच्या रहिवासी जकिया शेख इम्रान शेख व धारबर्डी सांगवी येथील केसरबाई भुपेश पावरा या दोन आदर्श मातांनी सावित्रीच्या लेकीन्ना जन्म दिला. बापुजी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविला जातो. स्री जन्मदर वाढला पाहिजे, मुलगी विषयी आदर वाटला पाहिजे, स्री भ्रूणहत्या बंद झाली पाहिजे, मुलगा मुलगी मध्ये भेदभाव नको यासह अनेक उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून संस्था कार्यरत असल्याचे कार्याध्यक्ष युवराज माळी यांनी सांगितले या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील,फुले सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई पवार, जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास सेन, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, भाजपा आध्यत्मिक शहराध्यक्ष संतोष माळी,पत्रकार सतिष पाटील, हेमंत माळी सर,सुरेश माळी,वसंत माळी सागर माळी व शिरपूर उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ.नम्रता ईशी,नैना सानप, लखन भुशिंगे, सुनिल पावरा विनोद निकम, सावता माळी व इतर मित्र परिवार उपस्थित होते.
3/related/default
