येत्या दोन दिवसांत...'; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

फुले शाहू आंबेडकर
0
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल येत्या १० जानेवारी रोजी लागणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारी ४ वाजता लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे
ज्येष्ठ उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निकम यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य केलं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य करताना उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे
महाराष्ट्रात ज्या काही आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्या दोन्ही गटाची एकत्रित सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांसमोर करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा निकाल येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहे, असं निकम म्हणाले
'१६ आमदारांना पाठविण्यात आलेल्या अपात्रता प्रकरणाची नोटीस ही दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे की अवैध आहे, या संदर्भात विधानसभा अध्यक्ष भाष्य करू शकतात. याच संदर्भातला निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे.परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही बाब प्रथम तपासून बघण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले
'16 आमदारांना अपात्रतेची बजावलेली नोटीस दिली होती, त्या नोटीसमधील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार ग्राह्य धरतो का होतो की नाही हे आधी तपासले जाईल. त्यानंतरच यावर निर्णय येणे अपेक्षित आहे, असेही निकम म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default