भयंकर! 3 मुलांची आई पतीला सोडून पळून गेली, 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत राहिली अन् आता...

फुले शाहू आंबेडकर
0
तीन मुलांची आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे.
तीन मुलांच्या आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे. नाल्यामध्ये या महिलेचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मीना अहिरवार ही महिला 50 वर्षांची होती. तिला तीन मुलं आहेत. ती पती उत्तम आणि मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. त्यानंतर ती त्याच्याच सोबत राहू लागली. 
मीनाच्या बॉयफ्रेंडचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मीना एकटी पडली.त्यानंतर ती तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली. त्याच्यामध्ये आणि मीनामध्ये खूप भांडणं व्हायची. मीना गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे. याच दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नाल्यात मीनाचा मृतदेह पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी मीनाचं लग्न ललितपूर जिल्ह्यातील महरौनी येथील उत्तम याच्याशी करून दिलं होतं. तिला अभिषेक, संगीता आणि लखन ही तीन मुलं आहेत. तिन्ही मुलं विवाहित आहेत. याच दरम्यान मीना महरौनी येथे राहणाऱ्या राजकुमाराच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती तीन मुलं आणि पती उत्तमला सोडून राजकुमारसोबत पळून गेली. पण कोरोनाच्या काळात तिचा प्रियकर राजकुमारचा मृत्यू झाला. 
राजकुमारच्या मृत्यूनंतर मीना एकटी पडली. मधल्या काळात तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी तिची मैत्री झाली. ती त्याच्यासोबत राहत होती. मीनाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की, रोज ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून जायची. पण ती कोणतं काम करायची हे कोणालाच माहीत नाही. शुक्रवारीही ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default