यामध्ये वर्षा थोरात या महिलेचा खून झाला असून अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. दहा – पंधरा दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़, हा मोबाईल थोरातने चोरल्याचे कोणीतरी त्याला माहिती दिली. त्याने या संशयावरून थोरात बाईकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली.
