आर.सी.पटेल प्राथमिक शाळा गुरुदत्त कॉलनी शिरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनात नवरसाचे नृत्याविष्कारातून सादरीकरण

फुले शाहू आंबेडकर
0

शिरपूर/ प्रतिनिधी: ( ओंकार ईशी) :- शहरातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा गुरुदत्त कॉलनी या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनातून नवरसाच्या माध्यमातून कला संस्कृतीचा अविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.प्रतिमा पूजन झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेचा पूर्ण वर्षाचा शालेय प्रगतीचा आढावा तसेच पालकांची शाळेप्रती असलेली सहकार्याची भावना तसेच शालेय प्रगतीचा आलेख आपल्या प्रास्ताविकेतून मांडला.
          कार्यक्रमाचा सुरुवातीला गणेश वंदना सादर करण्यात आले. त्यानंतर शृंगार रसापासून सुरुवात करुन गुलाबाची कळी हे गाणे, वात्सल्य रसात बापू सेहत के लिए, करुणा रसात मा थीमवरील नृत्य, रुद्र रसामध्ये उज्जैन के महाकाल हे गाणे, शांती रसात गौतम बुद्धांवरील गीत, वीर रसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत, भयानक रसात हॉरर डान्स, हास्य रसात जोकर डान्स, भक्ती रसात रामलीलाच्या माध्यमातून रामायणाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात नवरसाची थीम साकार करण्यात आली. विशेष म्हणजे भयानक रसातील हॉरर डान्सच्या वेळी शालेय प्रांगणातील संपूर्ण दिव्यांचा प्रकाश हा बंद करण्यात आला व हॉरर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षणाचे गीत म्हणून भक्तीरसातील रामलीलाच्या माध्यमातून रामायणाचे सादरीकरण करण्यात आले. रामायणाचे सादरीकरण होत असताना उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण दिवे बंद करून रामाची आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी संपूर्ण प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून शाळेचा परिसर हा झगमगट केला.
       सदर कार्यक्रमाला जि.प. सदस्या सखुबाई पवार या अध्यक्ष म्हणून तर संगीताताई देवरे, आशाताई बागुल, अनिल बाविस्कर, विजय पवार, रवींद्र पावरा, मनोहर पाटील, मनीषा पाटील, राजेंद्र पाटील, हेमंत सनेर, जगदीश पाटील, संध्या जैन,नागोसिंग राजपूत, योगेश पाटील, प्रवीण महाजन, महेंद्र माळी, प्रशांत चौधरी, तुषार शेटे, बी.आर. महाजन, रेखा सूर्यवंशी, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, महेंद्र परदेशी, रवींद्र खोंडे, प्रदीप गहिवरे उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भिल, शितल पाटील, मनीषा भदाणे यांनी केले तर आभार गोपाल वरसाळे यांनी मानले.
              कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत सोनवणे, अलका गोराणे, कृष्णा पावरा, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default