आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी येथील एक अल्पवयीन मुलीस घरी येऊन दुचाकीवर घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील एका हाॅटेलवर नेत भावकीतील तरूणानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील १५ वर्षीय मुलीला तिच्या भावकीतील तरूणाने ११ फेब्रुवारी रोजी घरी येऊन दुचाकीवर बसवून अहमदनगर जिल्ह्यातील एका हाॅटेलवर नेले. विश्वासातील तरूण असल्याने मुलगी देखील गेली. पण नंतर हाॅटेलमध्ये गेल्यावर त्याने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर मुलीला परत घरी आणून सोडले. मुलगी घाबरून शांत राहिली. मात्र, त्रास असह्य झाल्याने बुधवारी मुलगी रडत असल्याने आईने विचारणा केली. यावेळी मुलीने घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर आईवडिलांसह पोलिस ठाण्यात येऊन पिडीत मुलीने तक्रार दाखल केली. यावरून आष्टी पोलिस ठाण्यात ३६३,३७६, बाललैगिक अत्याचार यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default