उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडासह वाहन जप्त; वनविभागाची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
सुरगाणा : वनपरिक्षेत्र उंबरठाण अंतर्गत रघतविहीर या जंगलात पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान वनविभागाचे पथक गस्तीवर असतांना खैर प्रजातीचे चोवीस नग जी.जे.१५, सी ९४८४ या टाटा सफारी गाडीमध्ये अवैध पणे वाहतूक करतांना आढळून आले.
वनविभागाने पाठलाग करुन गाडी अडवली असता खैर लाकुड आढळून आले.
वनविभागाने खैर लाकडासह वाहन जप्त करून ताब्यात घेतले असून वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी पंचनामा केला असता वाहनांसह तीन लाख अकरा हजार एकशे एकोण सतर रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी, सहायक वनरक्षक उमेश वाघ, उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ई. टि. भले, बी. आर. चव्हाण, वनरक्षक ए. डी. छगणे, वाय. व्ही. बहिरम, व्ही. डी. पवार, एम. एम. देशमुख, वनमजूर कामडी, राजाराम चौधरी, जाहुल चौधरी, भगरे, शांताराम गावित, अरुण पवार, अभी चौधरी यांनी कारवाई केली.
चालक व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. वनविभागाने कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default