अपघातानंतर रामदास आठवलेंची फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्र ला प्रतिक्रिया
या अपघातानंतर रामदास आठवले यांनी फोनवरुन 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी काल महाडला होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो. रात्री ९ वाजेपर्यंत मी महाडमध्ये होतो.त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेलो. त्याठिकाणी माझा मुक्काम होता. त्यानंतर मी वाईमध्ये आलो. वाईमधून मुंबईला निघालो तेव्हा सव्वा सहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. तेव्हा आमची पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण आमची गाडी ठोकली. यामध्ये आमच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आई होती. मात्र, आम्ही सगळे सुखरुप आहोत, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
