धुळे नकाणे तलाव गाळमुक्त कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

फुले शाहू आंबेडकर
0
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत नकाणे तलाव येथे सुरू असलेल्या कामास जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी (ता. २८) भेट देऊन पाहणी केली.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत नकाणे तलाव येथे सुरू असलेल्या कामास जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी (ता. २८) भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी मशिनरी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या. जिल्हा जलसंधारण अधिकारी खोंडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक महाले, नाम फाउंडेशनचे प्रदीप पानपाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी ७ मार्च २०२४ च्या आदेशानुसार गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत नकाणे तलावातून गाळ काढण्यास परवानगी तसेच किसान ट्रस्ट यांना स्वखर्चाने गाळ काढून वाहून नेण्यास परवानगी दिली आहे.

नकाणे तलाव येथून दररोज ७५ टॅक्टर, २५ डंपर व दोन पोकलॅनच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, नाम फाउंडेशनला मशिनरी वाढविण्याबाबत तसेच जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी भेटीदरम्यान दिल्या.

गाळ काढण्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून नकाणे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी काढलेला गाळ घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default