माेबाईल चाेरट्यांचा देवपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे शहरातील मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना देवपूर पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. अटकेतील दाेघांवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. 
देवपूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान दोघा सराईतांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकून पोबारा केला हाेता. या संदर्भात संबंधित तक्रारदाराने पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस पथकातील अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ हालचाली करुन तपास करीत दाेघांना अटक केली.
त्यांच्याकडून त्यांनी चोरलेला मोबाईल व यादरम्यान त्यांच्याकडे असलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या दोघांविरोधात विविध कलमान्वये यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. देवपूर पोलिस ठाण्यात दोघा सराईतांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवपूर पोलिस निरीक्षकांतर्फे देण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default