फुलपाट (ता. धरणगाव) ग्रामपंचायतींतर्गत १६ लाखांच्या रस्त्याचे काम झाले असून, त्या कामाच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराने ठरलेली रक्कम देऊनही त्याच्याकडे अतिरिक्त एक लाख रुपये मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित कंत्राटदार आणि सपरंच पती यांच्यात झालेल्या संभाषणाची टेप विविध सामाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल करण्याची आता मागणी होऊ लागली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रहिवास असलेला धरणगाव तालुक्यात फुलपाट गाव आहे. फुलपाट ग्रामपंचायतींतर्गत १६ लाखांच्या रस्ते काँक्रिटीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. काम पूर्ण झाले असून, या कामात ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराने अगोदरच १० टक्के बिल मंजुरीसह स्वाक्षरी करणाऱ्यांना कबुल करून दिले आहेत.
असे असताना अतिरिक्त रक्कम मिळावी, म्हणून कंत्राटदाराला संबंधिताकडून त्रास दिला जात असून, कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची लाच (खंडणी) मागितली जात असल्याचे व त्याला कंत्राटदार विरोध करीत असल्याच्या संभाषणाची क्लीप गेल्या दोन दिवसांपासून विविध समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल झाली आहे.
संबंधितांवर कारवाईची मागणी
कंत्राटदारास १ लाख रुपयांची (एक पेटी) ची मागणी करणारा व्यक्ती सरपंचाच पती असून, आप्पा (ग्रामसेवक)चे नाव पुढे करून ते स्वाक्षरीला नाही, असे म्हणत आहे. असे सांगून शेवटी बघा. मग तुम्ही, अशी धमकीही देत आहे. घडला प्रकार पालकमंत्र्यांच्या गावाजवळचाच असून.
अशा पद्धतीने कंत्राटदारांना खंडणी मागणारे लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने स्वयंस्फूर्तीने दखल घेत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच जिल्हा प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
