निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
बुलढाणा जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर सिंदखेड राजा येथील तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल ट्रॅक्टर सोडण्यासाठी जैस्वाल याने 35 हजार रुपयांची लाच घेतल्याने त्याच्यावर कारवाई झाली.
बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आणि वाहतुकीला आळा बसावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई सुरु आहे
सिंदखेड राजा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले हाेते. हे रेतीचे ट्रॅक्टर साेडविण्यासाठी तहसिलदा सचिन जैस्वाल याने लाचेची मागणी केली. तक्रारदाराने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान हे ट्रॅक्टर सोडण्यासाठी जैस्वाल याने 35 हजार रुपयांची लाच घेतल्याने त्याच्यावर आज कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default