ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेण्यासाठी हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील हे दोंडाईच्याला गेल्यानंतर तडजोडीसाठी दिड लाख रुपये देण्याच ठरले परंतु याबाबत आधी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्यात आली होती या पथकाने लाच घेताना नितीन मोहने व अशोक पाटील यांना ताब्यात घेतले यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
धुळे लाचखोर पीआयकडे सापडले 60 लाखांचे सोन्याचे बिस्किट:सव्वादोन कोटी रुपयांचे घबाड; हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी घेतली दीड लाखाची लाच
बुधवार, एप्रिल ०३, २०२४
0
दोंडाईचातील संशयितावर हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करुन दीड लाख लाच घेणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात सुमारे सव्वादोन कोटींचे घबाड सापडले आहे. यात सुमारे ६० लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने, ७७ हजार रुपये किमतीचे चांदीची भांडी व दागिन्यांचा समावेश आहे. या शिवाय कुटुंबीय व नातलगांच्या नावाने असलेली सुमारे एक कोटी ७५ लाखांच्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडले आहेत. त्यांचा एकत्रित आकडा हा सुमारे दोन कोटी ३५ लाखांपर्यंत आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली.
Tags
