मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी भागातील ही घटना घडली. यामध्ये मंगल गोखले असे मृत महिलेचे म्हणजेच आईचे नाव आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी याप्रकरणी योगिता गोखले आणि तिचा मित्र यश शितोळे या दोघांवर गुन्हा दाखल केलाय.
हत्ये मागचं कारण
योगिताने मित्र यशच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. आईला न सांगता आपण पैसे काढले आहेत. त्यामुळे तिला समजेल तेव्हा ती खूप रागवेल अशी भीती योगिताच्या मनात होती. यातून तिने आईची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
तिने प्लान आखला आणि आपल्या मित्राला घरी बोलावलं. घरातील हातोडा त्याला दिला. त्यानंतर या मित्राने आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात हातोडा घातला. जोरात मार लागल्याने यातच आईचा मृत्यू झाला.
