प्राप्त माहितीनुसार धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरामण बैसाणे ( वय ४०) या धुणी-भांडीचे काम करतात. त्यांच्यात व पती हिरामण वाल्मीक बैसाणे (वय ४९) यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते. शनिवारी दुपारी अनिता या कामावरून घरी जात असताना पती हिरामण बैसाणे यांनी त्यांना पांझरा नदीकिनारच्या समांतर रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले.
धुळे येथे कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा
रविवार, एप्रिल १४, २०२४
0
काैटुंबिक वादातून पतीने पत्नीला रस्त्यात गाठून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी धुळे शहरातील नकाणे रोडवर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिता हिरामण बैसाणे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Tags
