पोलिसांनी याप्रकरणी तरुणीचा प्रियकर निजामुद्दीन अली याला अटक केली आहे. अली हा टॅक्सी चालक आहे. त्याने कल्याण खडवली येथे तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह चिरणेर येथे टाकला होता. इतरांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या संशयावरुन ही हत्या झाल्याचं समोर आलंय.
२७ वर्षीय मृत तरुणी ही मानखुर्दच्या साठे नगरमध्ये राहायची. ती उदरनिर्वाहासाठी घरकाम करायची. टॅक्सीचालक निजामुद्दीन अली हिच्याशी तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु झालं. चार वर्षांपासून ते प्रेमसंबंधात होते. निजामुद्दीन हा मुळचा उत्तर प्रदेशच्या लखनौचा आहे. त्याचे लग्न झालेले आहे. त्याला एक लहान मुलगा देखील आहे.
निजामुद्दीन आणि मृत तरुणी कल्याणजवळील खडवली येथे फिरायला गेले होते. यावेळी तरुणीला काही फोन आले. त्यामुळे निजामुद्दीनचा संताप झाला. त्याने तरुणाला मारहाण केली आणि तिचा गळा दाबला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मृतदेह एका गोणीत आणि चादरीमध्ये गुंडाळून तो दहा-बारा फूट खोल खड्ड्यात टाकून दिला.
राजकीय नेत्यांकडून धार्मिक रंग?
सदर प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मंगलप्रभाल लोढा म्हणालेत की, बांग्लादेशी, रोहिंग्यांच्या वाढत्या घुसखोरीला लक्षात घेऊन मानखुर्दमध्ये असलेल्या सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम तोडून सरकारी जमीन मोकळी करावी. बांग्लादेशी, रोहिंग्यांसाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येईल. जोपर्यंत आरोपीसह कटात सामील असलेले त्याचे सहकारी पकडले जात नाहीत, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील
