शिंदखेडा रेल्वे स्टेशनजवळ अडिच लाखांचा गुटखा जप्त! शिंदखेडा पोलिसांनी कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर शिंदखेडा रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन लाख ३४ हजार ८० रूपये किंमतीचा गुटखा शिंदखेडा पोलिसांनी जप्त केला. याबाबत शनिवारी (ता.२७) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार (वय ४०) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, महेश पितांबर चौधरी (वय ३८, रा. नगरपंचायतीजवळ, शिंदखेडा) शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर शिंदखेडा रेल्वे स्टेशनलगत केसरयुक्त विमल पानमसाला (एकूण पाकिटे ६२४, एकूण किंमत एक लाख १६ हजार ६८८ रूपये).
तंबाखू (एकूण पाकिटे ६२४, किंमत २० हजार ५९२ रूपये), केसरयुक्त विमल पानमसाला (एकूण पाकिटे ४४०, किंमत ८७ हजार १२० रूपये) व तंबाखू (एकूण पाकिटे ४४०, किंमत ९ हजार ६८० रूपये) असा एकूण किंमत दोन लाख ३४ हजार ८० रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
संशयित आरोपी महेश पितांबर चौधरी याला शुक्रवारी सायंकाळी शिंदखेडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default