सुनील नटवर राणा (४५, रा. मीनाक्षी डेअरीजवळ, पादरा, जि. बडोदा, गुजरात), चंद्रेश भीकाभाई पटेल (३२, रा. चिप्पाड तलाव झोपडपट्टी, पादरा, जि. बडोदा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेचे अंमलदार शंकर काळे यांना परराज्यातून येणाऱ्या ट्रकमध्ये विदेशी मद्याचा साठा असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडच्या भीमनगर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानुसार संशयित आयशर ट्रक (जीजे ०६ एटी ६४७३) आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने ट्रकला रोखले.
ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी मद्य व बिअर असा १ लाख ७७ हजार ३६० मद्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. ७ लाखांचा आयशर ट्रक व मद्यसाठा असा ८ लाख ७७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक निरीक्षक सचिन जाधव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, परमेश्वर दराडे, संजय पोटिंदे, मधुकर साबळे यांनी बजावली
एक्साईज नाकाबंदी कुचकामी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क, पोलिस यंत्रणा यांना नाकाबंदी करीत कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी सुरू केली आहे.
