विद्यमान सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले! मुरमा येथे सरपंचपदी रोजगार सेवकाची पत्नी

फुले शाहू आंबेडकर
0
पाचोड : गेल्या दहा वर्षापासून मुरमा (ता.पैठण) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचाविरुद्ध गावाचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्रामरोजगारसेवकाने आपले गट उभे करून पत्नीसह पाच जणांना निवडून आणले, मात्र सरपंच पदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गा (ओबीसी)स सुटल्याने पत्नीची सरपंच पदाची संधी हुकली, सिंधूबाई शिदे यांचे अपील फेटाळून लावत जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे पुन्हा रोजगारसेवकाची पत्नी उषाताई मापारी यांस सरपंचपदाची नामी संधी मिळाली आहे.
आता ज्या ठिकाणी दिनकर मापारी ग्रामरोजगारसेवक म्हणून काम करित आहे, तेथे त्यांच्या पत्नीची सरपंचपदाची 'लॉटरी' लागली. गत विद्यमान सरपंचा विरुद्ध रोजगारसेवक, अन् त्यात विद्यमान सरपंचाचा अतिक्रमणामूळे पायउतार होऊन सत्तांतर होणे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. रोजगारसेवक दिनकर मापारी हे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे खंदे समर्थक समजले जातात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default