दिल्लीतील ही तरुणी 3 वर्षांपूर्वी मुंबईला काही कामानिमित्त गेली होती, अनेक दिवस तिने मुंबईत मुक्काम केलाय. या दरम्यान ओळख अकोल्यातल्या मोहसीनशी झाली. या दरम्यान दोघांच्या भेटी-गाठी वाढल्या, आणि दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतरानं त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल. दोघांनी सुरुवातीला काही दिवस प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्याचवेळी मोहसीनने तिला लग्नाचं वचन दिलं.
त्यानंतर त्यांने तिला तिला अकोल्यात आणलं आणि शहरातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये तिला मुक्कामी ठेवलं. इथं तिच्यावर त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. त्यानंतर पीड़ित तरुणी दिल्लीला घरी परतली. पुढं काही महिन्यानंतर पुन्हा त्याने तिला अकोल्यात बोलावलं. पढे हे प्रकार असेच सुरूच राहिले.
तब्बल 3 वर्ष दोघेही रिलेशनशिप'मध्ये राहिले, पुढं तिने मोहसीकडे लग्नाची मागणी घातली. अनेकदा त्याने लग्नासाठी टाळाटाळ केली. काही महिने त्यांच्याकडून टाळाटाळ सुरू होती. अखेर त्याने तिला स्पष्टच नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. लागलीच तिने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठल, त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोहसीनंविरुद्ध लग्नाच आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनेकदा अत्याचार केल्याच्या आरोपावरून 376, 376(2N), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मोहसीन फरार असून पोलीस त्याच्या शोध घेतायेत.
