आव्हाणे रस्त्यावर अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे मळे आणि शेत असून, बहुतांश ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. लक्ष्मी जिनिंगमध्ये कंत्राटदाराकडून कामावर ठेवले जाणारे मजूरही सर्वच परप्रांतीय असून, जवळच या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था आहे. सुरेश सोलंकी एका खोलीत वास्तव्यास हेाता.
त्याची मुकादम मनोज सोनवणे यांच्याशी शनिवारी (ता. २०) दुपारी शेवटची भेट झाली. त्यानंतर तो त्याला न भेटल्याने सोनवणे त्याचा शोध घेण्यासाठी ओळखीच्या मजुरांना विचारपूस करीत होता. अशातच जिनिंगच्या मागील शेतात सुरेशचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
नुकताच मोबाईल घेतला
सुरेश सोलंकी याने एक-दोन दिवसांपूर्वीच ॲन्ड्राईड मोबाईल खरेदी केला हेाता. त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुक सुरू करण्यासाठी त्याने मोबाईल मुकादम मनोज सोनवणे यांच्याकडेच दिला होता. मनेाजने हा मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.
ती’च्यासोबत असताना वार
घटनास्थळावर पोलिसांना महिलेच्या पायातील एक पैंजण, जोडवे, गळ्यातील मंगळसूत्र, असा ऐवज मिळून आला असून, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृत सुरेश सोलंकी त्या महिलेसोबत असताना, मारेकऱ्याने त्याच्यावर पाठीमागून डोक्यावर वार केल्याने त्याला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
‘एक फुल दो माली’
मृत सुरेश सेालंकी याचे एका महिलेशी मैत्री होती. त्याच महिलेसोबत त्याच्या मित्राचेही संबंध असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक परप्रांतीय महिला व त्याच्या मित्राला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून, दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
डोक्याला बांधला शर्ट
मृत सुरेश सोलंकी याच्या डोक्याला अंगातील शर्ट घट्ट बांधला होता; जेणेकरून रक्तस्त्राव थांबेल. जवळच शेताच्या बांधाजवळ त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या हत्याराने हल्ला केल्यानंतर मारेकरी किंवा त्याच्यासोबतच्या महिलेने त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागल्याने रक्त थांबविण्यासाठी बांधला असावा.
आणि त्याला जवळच कडबा ठेवलेल्या ताडपत्रीवर आणला असावा, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, एकाच वारमध्ये सुरेशची कवटीच फुटल्याने अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन, तो मत झाल्यावर संबंधितांनी येथून पळ काढल्याचे बोलले जात आहे.
खून प्रकरणात एक अटकेत
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे रोडवरील लक्ष्मी जिनिंगच्या मागील शेतात सुरेश परमसिंग सोलंकी (वय २६, रा. खेमला, ता. सेंधवा, ता. बडवाणी मध्य प्रदेश) या परप्रांतीय कामगाराचा अनैतिक संबंधातून खून केल्याच्या शनिवारी घडलेल्या घटनेत रामलाल नाना बारेला (रा. केरमला वलवाणी, ता. वरला जि. बडवानी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
