अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील परतोडी रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याने स्थानिक ग्रामीण शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यात 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त करत घाट मालकासह 19 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करत चार जणांना अटक केली
या मध्ये आठ ट्रक, दोन ट्रॅक्टर, दोन पोकलेनसह साहित्य पोलिसांनी जप्त केले. नियमबाह्य रीतीने रेती चोरून दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूलाची वाट रेती तस्कर लावतात. आता मात्र या कारवाईमुळे रेती माफियात खळबळ उडाली आहे.
या कारवाई केलेल्या रेती घाटात मोठ्या प्रमाणावर याच आरोपींनी रेती चोरली आहे तर इतरही रेती घाटात चोरी होत असल्याने त्या ठिकाणी देखील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सापळा रचत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default