अमित शाह यांच्या फेक व्हिडिओचे सापडले धागेदोरे; जिग्नेश मेवाणीचा पीए आणि AAP नेत्याला अटक

फुले शाहू आंबेडकर
0
गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा स्वीय सहायक आणि एका आप कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गृहमंत्र्यांचे एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.
केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते अमित शाह यांचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी फेक व्हिडिओप्रकरणात काँग्रसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए सतीश वर्सोला याला अटक केली आहे. गुजरातमधील पालनपुर येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर आर बी बारिया याला लिमखेडा येथून अटक करण्यात आली. तो आम आदमी पक्षाचा दाहोद जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ एका राजकीय ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचे तपासाता समोर आले आहे 

सतीश असं करणार नाही

काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या सर्व घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. ” मी माझ्या जीवनात फेक व्हिडिओ, वा त्याचा समर्थक असू शकत नाही. मी अशा सर्व गोष्टींची निषेध करतो. निवडणूक काळात कोणाला असे लक्ष्य करणे योग्य नाही. सतीश मला भावा सारखा आहे. मला त्याचा मित्र असल्याचा अभिमान आहे. पण तो अशी व्यक्ती नाही, जो नाहक, वाईट विचाराने काही करील. मी 6 वर्षांपासून त्याला अत्यंत जवळून जाणतो.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default