धुळे शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या ८० फूट रोड परिसरात असलेल्या लाकडाच्या वखारीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धावपळ सुरु झाली होती. वखारीतून धूर निघत असल्याचे दिसताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण लाकूड असल्याने आग विझली नाही. यानंतर अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. जवळपास पाच ते सहा अग्निशमन बाबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अद्याप बहुतांश प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले असून अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
