धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चोराखळी गावाजवळ दरोड्याच्या तयारीतील टाेळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. हे संशयित आराेपी मोक्का गुन्ह्यात तडीपार असून तिघांना सशस्त्र अटक केल्याची माहिती धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिली
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे व त्याचे इतर साथीदार येरमाळा परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येरमाळा परिसरात रात्रगस्त सुरू केली होती.
त्यानुसार धुळे - सोलापूर महामार्गावर चोराखळी गावाजवळील एका हॉटेल नजीक 5 जण संशयित आढळले. पोलिसांनी त्यांची चाैकशी सुरु करताच त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दाेघे यशस्वी झाले. पोलिसांनी पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल,एक कत्ती,एक कटावणी ताब्यात घेण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default