निवडणुकीत पैशांचा पाऊस? रस्त्यावर पडले सात कोटी; नोटांनी भरलेले वाहन उलटले

फुले शाहू आंबेडकर
0
निवडणूक सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडू लागली आहे. दोनच दिवसांच्या फरकाने अशीच एक घटना पुन्हा एकदा आंध्र प्रदेशात समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल सात कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. नल्लाजर्ला मंडळातील अनंतपल्ली येथे एका ट्रकच्या धडकेने एक छोटे वाहन उलटले आणि हा प्रकार समोर आला. यात खोक्यांमध्ये सात कोटी ठेवले होते. विशेष म्हणजे, चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशात मतदान होणार आहे. त्यापूर्वीच येथे लागोपाठ दोन दिवस मोठ्या रकमा सापडल्या आहेत.
आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी देखील आंध्र मधीलच एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सात कोटी जप्त करण्यात आले आहेत. पूर्व गोदावरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. इथे सात खोक्यांमधून सात कोटी नेले जात होते. ट्रकने धडक दिल्याने आणि वाहन उलटल्याने असे पैसे नेले जात असल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांना गाडीत नोटांची पोटी दिसल्यावर त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची सूचना दिली. या वाहनातून जप्त करण्यात आलेली रक्कम सात कोटी एवढी असल्याचे सांगितले जात आहे. विजयवाडा येथून विशाखापट्टणम येथे हे वाहन जात असताना हा अपघात झाला. ज्या गाडीत पैसे होते, त्या गाडीचा चालक जखमी झाला असून त्याला गोपालपूरम येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशात चौथ्या टप्प्यात मतदान 
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा असून इथे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे रोजी इथे मतदान होणार आहे. त्यापूर्वीच इथे लागोपाठ दोन दिवस मोठ्या रक्कमा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कामगिरी पार पाडली. इथे चेकिंगवेळी तब्बल आठ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ट्रक आणि पैसे जप्त करत चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोकड असलेला हा ट्रक गरिकापाडू चेक पोस्टवर तपासणीवेळी आढळला. ही रक्कम हैदराबादहून गुंटूरला घेऊन जात होते. पोलिसांनी ही रक्कम तपास यंत्रणांकडे सोपवली आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default