प्रेम प्रकरणातून दोघा भावांचा खून

फुले शाहू आंबेडकर
0
बेळगाव : अल्पवयीन मुलीच्या मागे लागलेला एक तरुण व त्याच्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सौंदत्ती तालुक्यातील कारीमनीजवळ ही घटना घडली असून त्या मुलीच्या वडिलांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मायाप्पा हळेगोडी (वय 20) व त्याचा भाऊ यल्लाप्पा हळेगोडी (वय 22) दोघेही राहणार कारीमनी, ता. सौंदत्ती अशी खून झालेल्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. फकिराप्पा बावीहाळ (वय 50), रा. दुंडनकोप्प याने या दोन्ही भावंडांचा चाकूने भोसकून खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी लोकसभेसाठी मतदान झाले. सायंकाळी मतदानानंतर पोलीस व सरकारी यंत्रणा मतयंत्रे स्ट्राँगरूमला पाठविण्याच्या घाईत असतानाच सोगल रोडवरील कारीमनीजवळ दुहेरी हत्या झाल्याची बातमी येऊन थडकली. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक पांडुरंगय्या एम., मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रेमाचा सोडला नव्हता तगादा
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून फकिराप्पाला ताब्यात घेतले आहे. फकिराप्पाच्या मुलीवर खून झालेल्या मायाप्पाचे प्रेम जडले होते. ती अल्पवयीन असूनही त्याने तिचा पाठलाग सुरू केला होता. फकिराप्पाने अनेकवेळा त्याला समज देऊनही मायाप्पाने प्रेमाचा तगादा सोडला नव्हता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default