वहिनींच्या पराभवासाठी रोहिणी खडसे उतरल्या मैदानात

फुले शाहू आंबेडकर
0
ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे त्यांची सून रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. दुसरीकडे मात्र मुलगी रोहिणी खडसे वहिनी रक्षा खडसे यांच्याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. तसेच, मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार श्रीराम पाटील यांना लीड देण्याचा शब्द रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्यासमोर दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांनी वहिनीच्या पराभवाचा चंग बांधल्याचे बोलले जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेला शरद पवार, जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
रोहिणी खडसे म्हणाल्या, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला तडा जाऊ देणार नाही. राष्ट्रवादीचे काम निष्ठेने करणार आहे. तसेच, मुक्ताईनगरमधून श्रीराम पाटील यांना लीड मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्यांच्या मदतीने करणार आहे. येथून श्रीराम पाटील यांना लीड कमी मिळाली, तर मी जबाबदार आहे. जर, लीड मिळाली, तर जनता जबाबदार आहे.
मला राष्ट्रवादीची विचारधारा आवडत असल्याने या पक्षात थांबणार आहे. आमच्या वाईट काळात शरद पवार यांनी दिलेली साथ आयुष्यभर विसरणार नाही. शरद पवार कन्येप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करतात. तसेच, शरद पवारांनी कन्येप्रमाणे मला सांभाळावं, अशी भावनिक साद रोहिणी खडसे यांनी घातली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default