नाशिकमधील गंगावाडी गावातील रहिवाशी बाबू भगरे तिसरी पास आहेत. मोलमजुरी आणि मासेमारी करतात तरीही त्यांच्यानावापुढे सर म्हणून उल्लेख होता. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघातील विजयी उमेदवार भास्कर भगरे शिक्षक असूनही त्यांच्या नावासमोर सर उल्लेख नव्हता. बाबू भगरे यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असून सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत तर नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.
नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात 1,03,632 मतं घेणारे अपक्ष उमेदवार गायब? कुटुंबीय पोलिसात तक्रार देणार
गुरुवार, जून ०६, २०२४
0
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही मतदारसंघात नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्यात आले होते. नाशिकमधील दिंडोरीतही भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. १ लाखाहून अधिक त्यांना मतं मिळाली होती. मात्र निकालानंतर ते अचानक गायब झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यानं कुटुंब चिंतेत असून पोलिसात तक्रात देणार असल्याचं त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.
Tags
