खलाणे येथील संजय बुबाभाई गिरासेसह परिवारासह झोपलेले असताना रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान सागर गुलाब पाटील घरात शिरलेला होता. आरडाओरडा ऐकू आल्याने तो घरातून पळून गेला. कपाट उघडे दिसले व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
लॉकरमधील पाकिटात ठेवलेले पाच ग्रॅमचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र दिसले नाही. तसेच लहान भाऊ रणजित गिरासे यांची अर्धा ग्रॅम सोन्याची अंगठी, १२ भार चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख दिसले नाहीत. सागर गुलाब पाटील यास घरी पाहण्यास गेले असता परंतु तो घरी दिसला नाही
घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड सागर पाटील याने चोरून नेल्याची खात्री झाली. शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविले असता सागरला अटक करण्यात आली. सोमवारी शिंदखेडा न्यायालयात हजर केले आसता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी. जी. ठाकरे तपास करीत आहेत.
