माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीद्वारे ठेवीदाराची फसवणूक; 6 जणांविरुद्ध गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
आकर्षक व्याजदरासह विविध प्रकारची प्रलोभने देत ठेवीदाराच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नाशिक येथील श्री माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहा संचालकांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला
रवींद्र शंकरराव पवार (रा. एकवीरानगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार संशयित विष्णू रामचंद्र भागवत याने माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (नाशिक) माध्यमातून ठेवीदारांना आकर्षक व्याजासह विविध प्रेक्षणीयस्थळी सहली तसेच सोने-चांदी देण्याचे आमिष देत ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले.
या आमिषाला बळी पडत सोसायटीत दोन लाख ७० हजारांची गुंतवणूक केली. मात्र, ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावर पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच शिरूड येथील कार्यालय बंद करून कर्मचारी पसार झाले. त्यावरून सोसायटीचा अध्यक्ष विष्णू भागवत, मुख्य अधीक्षक प्रफुल्ल निस्ताने, अभिजित येरूरकर, व्यवस्थापक सपना संदीप भागवत, प्रतिनिधी मंगला सुपडू मोरे व संदीप अशोक पाटील या संशयितांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default