जळगावात तलवारीच्या धाकावर दहशत माजवणा-या तरुणास केलं जेरबंद

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात तलवारीच्या धाकावर दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडील तलवार हस्तगत केली आहे. फैजल शेख कदीर (रा. मास्टर कॉलनी, मेहरुण परिसर, जळगाव) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, फैजल शेख कदीर हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन तांबापुरा परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून फैजल यास ताब्यात घेत पुढील कारवाई केली. दिनांक १२ जून रोजी त्याच्या कब्जातील तलवार हस्तगत करण्यात आली.
पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोना विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, चंद्रकात पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default