बोगस बियाणांची विक्री सुरूच; विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे येत आहे. परंतु कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असून यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी सुरु आहे. यात काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. दरम्यान  नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश सीमावर्ती भागात असल्याने नंदुरबारमध्ये गुजरात व मध्य प्रदेशातून कापसाचे बियाणे विक्रीसाठी आणले जातात. मात्र यातील काही बियाणे हे बोगस निघत असून  शेतकऱ्यांची यात फसवणूक होत असल्याने नुकसान होत आहे. यावर कृषी विभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 
जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून आता बियाणे घेऊन पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी बोगस बियाणांची विक्री सर्रास होत असते. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने  बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली नाही; तर आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default