सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, अहमदनगरमध्ये पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला

फुले शाहू आंबेडकर
0
अहमदनगरमध्ये पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडलीये.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात विभक्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केल्याचा घटना समोर आली आहे. दरम्यान, पतीने केलेल्या ॲसिड हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील नाथनगर येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
नागरिकांनी महिलेची मदत केल्याने मोठा अनर्थ टाळला
अधिकची माहिती अशी की, भाळवणकर पती-पत्नी हे गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत होते. याचाच राग येऊन आरोपी पती निलेश पांडव याने पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून तिला गंभीर जखमी केले आहे. आरडा- ओरडा झाल्याने बाजूला असलेल्या नागरिकांनी या महिलेची मदत केल्याने पुढचा मोठा अनर्थ टाळलाय. या घटनेत ही महिला सुमारे वीस टक्के भाजली आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न 
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अक्षय अंकुश गायकवाड (वय 27, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय 28, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default