तहसीलदारांच्या केबिनमध्येच अधिकाऱ्याची आत्महत्या
बुधवार, नोव्हेंबर ०६, २०२४
0
बेळगाव : बेळगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य केबिनमध्ये अधिकाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. रुद्रेश उर्फ (रुद्रण्णा) यडवन्नावर वय ३६ असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तहसीलदार यांच्या केबिनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त बेळगाव शहरात वाऱ्यासारखे पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, यडवन्नावर हे तहसील कार्यालयातच कार्यरत होते. ते आज सकाळी घराबाहेर ते पडतेवेळी तणावात होते असे समजते. मात्र अद्याप कोणत्या कारणास्तव त्यांनी आत्महत्या केली हे समजू शकले नाही. खडेबाजार पोलीस ठाण्यात या गुन्हाची नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.
Tags
