जे आर पवार साहेबांनी ३ वर्ष बंद असलेला वृद्धेश्वर कारखाना सुरू केला--धोंडे साहेबांनी एमडी पदाची संधी दिली असती तर कडा कारखाना बंद पडला नसता-- प्रदीप थोरवे

फुले शाहू आंबेडकर
0
प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
  आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथे मा.जे आर पवार साहेब यांच्या कृतज्ञता सोहळ्यानिमत्त मा ना बाळासाहेब थोरात,पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिकाताई राजळे,आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे ,माजी आमदार बाळासाहेब आजबे ,
माजी आमदार साहेबराव दरेकर,माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, युवा नेते सागर धस, प्रदीप थोरवे आदींची भाषणे झाली . या प्रसंगी प्रदीप थोरवे आपल्या भाषणात पवार साहेबांनी ३ वर्ष बंद असलेला वृद्धेश्वर कारखाना सुरू केला, धोंडे साहेबांनी एमडी पदाची संधी दिली असती तर , आष्टी तालुक्यातील कडा कारखाना कधीच बंद पडला नसता , असे बोलताच माजी आमदार धोंडे साहेबांनी सांगितले प्रदीप थोरवे नी सांगितल पवार साहेब बंद पडलेले कारखाने सुरू करतात,पवार साहेबांनी आत्ता याव आणि कारखाना सुरू करावा आम्ही त्यांच स्वागत करु. यावेळी पवार साहेबांनी सुधा आपल्या भाषणात आपण आष्टी तालुक्यातील कडा कारखाना सुरू करण्यासाठी लागल ती मदत करू. राजकीय जोडे सर्वच जण बाजूला ठेवा. आपण एकत्र येऊन आष्टी तालुक्याची कडा कारखाना ही असलेली कामधेनू आपण पुन्हा सुरू करू. यावेळी सागर धस यांनी सुद्धा आवर्जून सांगितले, आपण प्रदीप ची मागणी पूर्ण करून आष्टी तालुक्याचा विकास करण्यासाठी एक नवीन कारखाना लवकर सुरू करणार आहोत. या सर्वच कारखान्याच्या चर्चेवरून उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण या प्रसंगी दिसुन आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default