सावता परिषद जिल्हा आढावा बैठक संपन्न

फुले शाहू आंबेडकर
0

 धुळे:-धुळे जिल्हा सावता परिषदेच्या वतीने जिल्हा आढावा बैठक जेष्ठ नागरिक संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती प्रथमतः संत शिरोमणी सावता महाराज क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.कल्याणराव आखाडे साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यात सावता परिषदेच्या बैठका होत आहेत. आज धुळे जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक तथा सावता परिषदेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष इजि.शिवानंद झोरे , प्रदेश संघटक श्री.दिलीपभाऊ माळी, सावता परिषदेचे संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.विलासभाऊ ढंगारे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश संघटक श्री.गोपाल देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा जिल्हाध्यक्ष बिपिन रोकडे यांनी केले.
    सावता परिषद ही माळी समाजाची दिशादर्शक संघटना आहे.संघटनेच्या माध्यमातून राज्यात मजबूत संघटन उभे राहिले आहे.तरूणांनी सावता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आले.जिल्हाध्यक्ष युवराज माळी, जिल्हा महासचिव ईश्वर माळी महानगर प्रमुख भिकन बाविस्कर यांनी परिषदेचा जिल्हा आढावा सादर केला प्रसंगी अनेकांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली. जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     बैठक यशस्वितेसाठी सावता परिषदेचे धुळे जिल्हा संघटक मंगेश माळी,सहसचिव किशोर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर माळी, सुनिल माळी, राहूल महाजन, युवराज महाजन, पप्पू माळी, विजय माळी, देवेंद्र माळी आदींनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default