शिरपूर हादरलं!गोदामात बनवलं ‘LOVE-लॉज’! ५ गुप्त प्रेमकोठड्यांवर पोलिसांची छापा मोहीम

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर (धुळे) – शहराच्या अवघ्या काही अंतरावर पत्र्याच्या गोदामात आजवर कधी न पाहिलेला किळसवाणा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस! प्रेमीयुगुलांसाठी ओळखपत्रशिवाय भेटण्याची ‘गुप्त सोय’ येथे केली जात होती.
पोलिसांनी गोदामावर छापा टाकत प्लायवुडच्या ५ मिनी-रूम्स सील केल्या. आत गाद्या, पडदे, टेबल अशी विकृत मांडणी पाहून अधिकारीही चक्रावल्‍ले
पैशासाठी विकृत व्यवसाय!
ओळखपत्र दाखवण्याच्या नियमाला चुकवून
“इथे या, बेधडक या!” असा भलताच बाजार
गोपनीय रूम-बुकिंगची सोय — किती तास तितके पैसे!
दामिनी पथकाची टार्गेट कारवाई
🔹 वरझडी शिवार – नागाई नगर परिसर
🔹 पूर्ण गोदाम रूपांतरित गुप्त लॉज
🔹 प्रेमीयुगुलांची चांगलीच गर्दी
🔹 परिसरात संशयाचे वातावरण
PSI हेमंत खैरनार यांच्या नेतृत्वाखाली धाड
अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती
🚔 गुन्हा दाखल – आरोपींची ओळख
▪️ गोदाम मालक बोरसे
▪️ व्यवस्थापक पावरा
 IPC 2023 – कलम 292, 3(5)
अश्लील कृत्यांना प्रोत्साहन, गोपनीय सुविधा, लपविलेला धंदा
दोघांचाही पलायनाचा मार्ग बंद – पोलीस कठोर चौकशीला सज्ज
 नागरिक झाले संतप्त!
“शहराचा चेहराच खराब करणाऱ्या अशा धंद्यावर मोठा हल्ला झाला पाहिजे!”
– परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया
“आई-वडीलांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवावा!”
– युवक संघटना
या धंद्याला आता ‘सील’
पोलिसांच्या कारवाईनंतर शिरपूरमध्ये चकचकाट
आता चौकाचौकात याच चर्चेला उधाण!
 शेवटचा पंच!
 “गोदामात लपलेलं प्रेम… पण कायद्याची नजर तर शिकारीच!”
शहराजवळील वरझडी शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमीयुगुलांना ओळखपत्र न दाखवता भेटण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एका पत्र्याच्या गोदामात छोटी-छोटी कपार्टमेंट तयार करून लपवलेल्या “गुप्त लॉज”चा शिरपूर पोलीसांच्या दामिनी पथकाने पर्दाफाश केला.
 पैसे कमावण्यासाठी बेकायदेशीर धंदा
अनेक लॉजमध्ये ओळखपत्र तपासणीची अट असल्याने प्रेमीयुगुलांना पर्याय नसतो. याचा गैरफायदा घेत गोदामच लॉजमध्ये रूपांतरित करीत, झटपट पैसा कमविण्याचा नवा उद्योग काही लोकांनी सुरू केला होता.
वरझडी शिवारातील नागाई नगर परिसरात उभारलेल्या पत्र्याच्या मोठ्या गोदामामध्ये प्लायवुडच्या पाच स्वतंत्र खोल्या आढळून आल्या. खोलींमध्ये गाद्या, टेबल, पडदे आदी सोयी उपलब्ध होत्या. बाहेरून सामान्य गोदामासारखा देखावा तयार करून गुप्त व्यवहाराला वाव दिला जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
 कारवाईदरम्यान पोलिसही थक्क
दामिनी पथकाने छापा टाकला तेव्हा खोलींची मांडणी आणि त्यातील सुविधा पाहून पोलिस सुद्धा आश्चर्यचकित झाले. ठिकाण सील करण्यात आले असून पुढील पुरावा संकलन सुरू आहे.
 आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणात गोदाम मालक बोरसे आणि व्यवस्थापक पावरा यांच्या विरोधात
भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करीत आहेत.
 नागरिकांचा दिलासा
या प्रकारामुळे परिसरात अस्वस्थता निर्माण झाली होती. कारवाईची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांचे कौतुक करत “अशा विकृत व्यवसायांवर कठोर कारवाईच स्वागतार्ह” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default