STRONG ROOM अंडर हाई अलर्ट! जिल्हाधिकाऱ्यांची धडक पाहणी – निवडणूक धामधूमीत सुरक्षेला फुल स्टॉप नाही!

फुले शाहू आंबेडकर
0
शहादा | विशेष प्रतिनिधी
शहादा नगर परिषद निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना पालीकेच्या टाऊन हॉलमध्ये उभारलेल्या स्ट्राँग रूमवर सुरक्षा चक्रव्यूह राबवण्यात आला आहे. मतमोजणी याच ठिकाणी होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी सोमवारी अचानक धडक तपासणी करत, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यास सस्पेन्शनची तयारी ठेवा, असा स्पष्ट इशाराच दिला!
🛑 “एकही संशयास्पद हालचाल दिसली तर तात्काळ कारवाई!”
— जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांचा रोखठोक संदेश
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्ट्राँग रूममध्ये केलेल्या तपासणीत…
🔻 तपासलेले मुख्य मुद्दे
✔ २४x७ सुरक्षा व्यवस्था
✔ सर्व प्रवेशद्वारांवर बंदोबस्त
✔ प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कव्हरेज
✔ व्हिडिओ रेकॉर्डिंगचे सतत मॉनिटरिंग
✔ मतमोजणी तळावर कठोर नियंत्रण
डॉ. शेट्टी म्हणाल्या –
 “निवडणुकीत कुणीही हात घालण्याचा प्रयत्न केला तर कडकात कडक कारवाई होणार! कामचुकारपणा नाही सहन! गरज पडल्यास कॅमेरे वाढवा!
 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फुल फोर्स ताफा
या पाहणीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारीया, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी साजिंद पिंजारी, अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिपक गिरासे उपस्थित होते
 मतदार राजा – त्याची सेवा आपली जबाबदारी!
मतदान केंद्रांवर
✔ अखंड वीजपुरवठा
✔ दिव्यांगांसाठी रॅम्प व मदत केंद्र
✔ मतदानापूर्वी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी
✔ आदर्श मतदान केंद्र उभारणीचे आदेश
“मतदाराशी कुठलीही गैरसोय? — तात्काळ ऍक्शन!”
मतमोजणीचा थरार – पोलिसांची फौज तैनात!
मतमोजणी दरम्यान तणाव टाळण्यासाठी…
अतिरिक्त सुरक्षा रिंग
गोंधळखोरांवर तात्काळ कडक कारवाई
संवेदनशील परिसरात पोलीस गस्त वाढ
🛑 लोकशाहीच्या या युध्दात ‘भिंती’ जाड — पण नजर आणखी जाड!
📌 २ डिसेंबर – मतदान
📌 ३ डिसेंबर – मतमोजणी
📌 फुल प्रूफ सुरक्षा – कोणतीही रिस्क नक
 कॅप्शन:
स्ट्राँग रूमची तपासणी करताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी व अधिकारी
शहादा नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर कुणीही गैरप्रकार करेल असा विचारही मनात आणू नये, असा कडक संदेश देत जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी मतमोजणी ठिकाण व स्ट्राँग रूमची सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली.
पालिका टाऊन हॉलमध्ये मतदान यंत्रांसाठी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची सीसीटीव्ही फुटेज, प्रवेशद्वारांची सुरक्षा, बंदोबस्ताची योजना याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारीया, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी साजिंद पिंजारी, अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिपक गिरासे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default