धडाकेबाज स्वच्छता मोहीम! दोंडाईचा होमगार्ड पथकाचा पोलिस स्टेशनवर स्वच्छतेचा धडाका!

फुले शाहू आंबेडकर
0
दोंडाईचा/ प्रतिनिधी (अनिल ईशी) :डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मोरारजी देसाई यांच्या प्रतिमांना मानवंदना देत स्वच्छतेचा धडाका
दोंडाईचा शहरात होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन यंदा अत्यंत शिस्तबद्ध व भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.
मा. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे साहेब यांच्या आदेशानुसार 6 डिसेंबर 2025 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत स्वच्छता अभियानाची जोरदार सुरुवात झाली.
प्रतिमा पूजनानं घेतला दिवसाचा मंगल प्रारंभ
दोंडाईचा पोलिस स्टेशनमध्ये
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व
होमगार्ड संघटनेचे शिल्पकार माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून मानवंदना अर्पण करण्यात आली.
होमगार्ड जवानांनी शिस्तबद्ध उपस्थिती लावून कार्यक्रमाला विशेष औदार्य प्राप्त करून दिलं.
पोलिस स्टेशन परिसरात स्वच्छतेचा धडाका
पूजनानंतर संपूर्ण पथक पोलिस स्टेशन परिसरात उतरलं आणि मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परिसरातील कचरा, धूळ, कचऱ्याचे ढिगारे हटवून परिसर चकचकीत करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ➤ श्री. दिनेश सोनवणे साहेब
एपीआय ➤ श्री. दिगंबर शिंपी साहेब
पीएसआय ➤ पठाण साहेब
दोंडाईचा होमगार्ड समादेशक अधिकारी ➤ अनिल ईशी साहेब
पलटण नायक ➤ मनोज वाडीले
कॉटर मास्टर सर्जन ➤ सुदाम बोरसे
 उपस्थित होमगार्ड जवान
इरफान सय्यद, अमिन शाहा, वंजी माळी, संदीप ठाकूर, प्रवीण बैसाणे, गणेश शिरसाट, योगेश जगताप, विजय लांडगे, विलास कुवर, गणेश साळवे, भटू चौधरी, बापू मराठे, राकेश गारंगे, अधिकार कोळी, मनोहर चव्हाण, चतुर बागल, सतीश मराठे, अमोल पाटील, मंगल शर्मा, गणेश कोळी, पंकज चव्हाण, गोविंदा भोई, दिपक सदाराव.
महिला होमगार्ड
कल्पना पानसरे, वर्षा बडगुजर, पल्लवी निकम, शिल्पा महाले, पुनम माळी, सविता पाटील, कल्पना निकम, सोनल जमादार व इतर महिला व पुरुष होमगार्ड देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाचा संदेश
होमगार्ड संघटनेने दिलेलं संदेश स्पष्ट —
“सेवा तर करायचीच… पण स्वच्छतेतून समाजाला आदर्श घालून द्यायचा!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default