सौर कृषी पंप घोटाळा उघड!अर्धवट साहित्य, कापलेल्या केबल–पाईपचा पुरवठा; महाऊर्जेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला मिळालेल्या साहित्याच्या डिलिव्हरीत भलतंच काहीतरी असून, कंपनीने दिलेलं मटेरियल अर्धवट, वापरलेलं आणि जाणीवपूर्वक कापलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पाईप कापून, केबल तोडून आणि अपूर्ण साहित्य देत शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत असून, महाऊर्जेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकऱ्याचा थेट आरोप

साहित्य अर्धवट
केबल–पाईप कापलेले
कंपनी प्रतिनिधीचे उद्धट उत्तर
वापरलेले साहित्य देण्याचा संशय
शेतकऱ्यांसाठी इशारा
डिलिव्हरीवेळी पॅकेजिंग तपासा
सीलबंद पॅक असल्याची खात्री करा
अपुरं किंवा कापलेलं साहित्य ताबडतोब नाकारावे
महाऊर्जा व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी
धुळे जिल्ह्यातून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणानं संपूर्ण राज्यातील सौर कृषी पंप योजने’*वर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. सरकारी सबसिडीवर मिळणाऱ्या पंपाच्या नावाखाली काही कंपन्या शेतकऱ्यांना अक्षरशः अर्धे-मुर्धे, कापलेले आणि निकृष्ट साहित्य देत असल्याचा आरोप समोर आला आहे.
शासनाची महत्त्वाकांक्षी योजना… शेतकऱ्यांचा विश्वास… पण प्रत्यक्षात मात्र मटेरियल डिलिव्हरीच्या नावाखाली सुरू आहे लूट आणि भ्रष्टाचाराचा खेळ!
साहित्य कापून दिलंय! पाईप तोडलेत! केबल कमी दिली!” — शेतकऱ्याचा संताप
योजनेत नाव मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपनीने पंपसाठी साहित्य पाठवलं. पण जेव्हा शेतकऱ्याने पॅकेज उघडलं, तेव्हा दृश्य पाहून त्याचे पाय थरथरले.
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार:
 1) अपुरं मटेरियल
आवश्यकतेनुसार फुल सेट देण्याऐवजी कंपनीने केवळ निम्मंच साहित्य दिलं.
 2) कापलेले पाईप – तोडलेली केबल

डिलिव्हरीत मिळालेली केबल तुटलेली, पाईप मधून कापलेले. हे साहित्य नवीन नसून जुने/वापरलेले असावं, असा संशय.
3) उद्धट उत्तर
याबाबत प्रतिनिधीला विचारल्यास, त्या कर्मचाऱ्याने थेट म्हणाले:
एवढंच मिळालं मटेरियल, काही करायचं असेल तर ऑफिसशी बोला!”
शेतकऱ्याची बोळवण… आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी बेफिकीर भाषा! प्रतिष्ठित कंपन्या सीलबंद मटेरियल देतात… मग या कंपन्यांची ही निर्लज्ज लूट का?
शक्ती सोलरसारख्या नामांकित ब्रँड्सकडून साहित्य सीलबंद, पूर्ण पॅकिंगमध्ये दिले जाते.
मात्र काही कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर सबसिडीचा गैरवापर करून पोटापाण्याशी गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांना फसवत आहेत, हे या प्रकरणातून स्पष्ट होते.
महाऊर्जा (MAHAURJA) गाढ झोपेत?
कंपन्यांच्या कारभारावर देखरेख नाही का?**
ही योजना महाऊर्जामार्फत राबवली जाते. पण कंपन्या शेतकऱ्यांकडून अशी उघड लूट करत असताना…
 महाऊर्जा यावर कारवाई का करत नाही?
निरीक्षण अधिकारी कुठे आहेत?
 डिलिव्हरी रिपोर्ट न पाहता पेमेंट कसे मंजूर होते?
शेतकऱ्याचा थेट आरोप:
“काही अधिकारी कंपन्यांशी संगनमत करून अशा अपूर्ण साहित्याला ‘ओके’ देतात. भ्रष्टाचाराशिवाय हे होऊच शकत नाही.”
या संगनमतामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांचाच छळ वाढतो आहे.
 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा — जागे व्हा, नाहीतर लुटले जाल!
 1) कंपनी काळजीपूर्वक निवडा
स्वस्त दर बघून फसू नका; रेकॉर्ड, सेवा, पॅकिंग तपासा.
 2) डिलिव्हरीवेळी पूर्ण तपासणी
पॅकिंग सीलबंद आहे का?
पाईप/केबल नवीन आहे का?
लांबी कमी केली आहे का?
साहित्य अपूर्ण आहे का?
🔸 3) ताबडतोब तक्रार करा
MAHAURJA
जिल्हा प्रशासन
जिल्हा उद्योग केंद्र
ग्राहक तक्रार केंद्र
🔸 4) एकत्र या – संघटित लढा उभारा
शेतकऱ्यांच्या एकतेपुढे कितीही मोठ्या कंपन्या आणि अधिकारी टिकू शकत नाहीत.
निष्कर्ष
राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणते…
आणि त्या योजनेतच कंपनी आणि अधिकारी एकत्र येऊन भ्रष्टाचाराचं जाळं विणतात, अशी स्थिती असेल तर शेतकऱ्यांचं भविष्य कोण वाचवणार?
सौर कृषी पंप योजनेतील हा प्रकार हा उघड सिंडिकेट घोटाळा असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default