जळगाव हादरलं! ६३ किलो गांजासह मुंबई कनेक्शनचा पर्दाफाश; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव | क्राईम न्यूज प्रतिनिधी
Jalgaon जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी जोरदार घाव घालत तब्बल ६३.७१० किलो गांजा जप्त केला आहे. पहूर (ता. जामनेर) पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत हा मोठा साठा पकडण्यात आला. या कारवाईत २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मध्यरात्रीचा सापळा अन् मोठा साठा जप्त
२ मार्च रोजी रात्री ११.४२ वाजता इनोव्हा कारमधून जळगावकडून पहूरकडे अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वाकोद गावाजवळ सापळा रचत संशयित वाहन अडवले.
तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील गांजा आढळून आला. जप्त गांजाची अंदाजे किंमत १२ लाख ७४ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन गाड्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी
सुमारे ७ लाख रुपये किमतीची सिल्वर इनोव्हा कार
३ लाख रुपये किमतीची पांढरी मारुती रिट्झ कार
असा एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 मुंबईतील तस्करांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी
सागर संजय इंगवले
इरफान अकरम शेख (रा. गोरेगाव) 
अमन ताज खान (रा. वर्सोवा) 
यांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक चौकशीत संशयितांनी शहरातील अन्य साथीदारांकडून गांजा खरेदी करून वाहतूक करत असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ (क), २० (ब), २२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
 तपासाचा फास अधिक आवळणार
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तस्करीमागील मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default