एकेकाळी लाखोंचा पगार, परदेशातील आलिशान आयुष्य… पण अचानक आलेल्या बेरोजगारीच्या वादळाने संसारच उद्ध्वस्त झाला! उत्तर बंगळुरुतील कोथनूर परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
३२ वर्षीय आयटी अभियंता भानू चंदर रेड्डी याने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली… आणि अवघ्या २० मिनिटांतच त्याची पत्नी बिबी शाझिया सिराज हिने १८व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं! या दुहेरी मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांच्या माहितीनुसार, शाझिया सिराज ही त्या दिवशी सकाळीच हैदराबादहून बंगळुरुला परतली होती. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने आणि पती फोन उचलत नसल्याने तिने सुरक्षा रक्षकांना बोलावलं.
दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, भानू रेड्डी हा बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. खोलीत एक चिठ्ठीही सापडली… ज्यात त्याच्या मनातील संघर्ष स्पष्ट दिसत होता.
“AI मुळे नोकरी गेली… तणावाने घेतला जीव!”
भानू रेड्डी अमेरिकेत नोकरी करत होता आणि त्याचा वार्षिक पगार तब्बल ८० लाख रुपये होता. मात्र गेल्या वर्षी ‘AI’मुळे झालेल्या मोठ्या नोकरकपातीमध्ये त्याची नोकरी गेली.
भारतामध्ये परतल्यानंतर तो बेरोजगारी, आर्थिक ताण आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याला तीव्र मानसिक तणाव आणि अँक्झायटीचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे.
शेवटची चिठ्ठी… आणि २० मिनिटांत संपले दोन जीव
पतीची चिठ्ठी वाचल्यानंतर शाझिया जवळपास २० मिनिटं फ्लॅटमध्येच थांबून होती. दरम्यान, शेजारी आणि पोलिसांची धावपळ सुरू होती.
मात्र या गोंधळात ती कधी बाहेर पडली, हे कुणालाच कळलं नाही… आणि काही वेळातच ती इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून मृत्यूला कवटाळलं.
गुप्त लग्न, कौटुंबिक ताणही कारण?
हे दाम्पत्य मूळ तेलंगणातील असून त्यांचं लग्न अडीच वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या लग्नाची माहिती शाझियाच्या कुटुंबीयांना नव्हती.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, कौटुंबिक तणाव, बेरोजगारी आणि मानसिक दडपण या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम या दुर्दैवी घटनेमागे असू शकतो.
आयटी क्षेत्रात भीतीचं सावट
