सनसनाटी उघड! “बाळू मामाचा अवतार” सांगत लाखोंची लूट मनोहर मामा भोसले जाळ्यात, पोलिसांचा मोठा सापळा यशस्वी

फुले शाहू आंबेडकर
0
सोलापूर | प्रतिनिधी : धार्मिक श्रद्धेचा आधार घेत लोकांची आर्थिक लूट आणि महिलांवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांनी गाजणाऱ्या मनोहर मामा भोसले याचा अखेर भोंदूगिरीचा मुखवटा फाटला आहे. स्वतःला “बाळू मामाचा अवतार” म्हणवणाऱ्या या तथाकथित बाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.




कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्ह्यात पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली. भोसलेच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून, यापूर्वीही त्याच्यावर सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
“पूजा करा, व्यवसाय वाढेल!” — 2 लाखांची मागणी, भक्ताची फसवणूक
भोसले लोकांच्या अडचणींचा फायदा घेत “पूजाअर्चा केल्याने व्यवसायात भरभराट होईल” असे आमिष दाखवत होता. एका भक्ताकडून तब्बल 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील 50 हजार रुपये घेतल्यानंतर कोणताही परिणाम न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने कुर्डुवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सापळा रचत भोसलेला ताब्यात घेतले.
 गंभीर आरोप: कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचे खोटे दावे
भोसलेवर केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून लोकांची दिशाभूल केल्याचेही आरोप आहेत. महिलांवर अत्याचाराच्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हे दाखल असून, यापूर्वी तो जामिनावर बाहेर होता.
 राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल — खळबळ वाढली
या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण देणारी बाब म्हणजे भोसलेचे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये
Sharad Pawar
Supriya Sule
Nitin Gadkari
Radhakrishna Vikhe Patil
Sunil Shelke
यांच्यासोबतचे फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र या फोटोमुळे कोणताही संबंध सिद्ध होत नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
 SP अतुल कुलकर्णी यांचा इशारा
सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, “मनोहर भोसलेवर आधीपासूनच बलात्कार, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करणार आहोत. आणखी कोणी फसवणुकीचा बळी ठरले असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी.”
 अंधश्रद्धेचा अंधार पुन्हा समोर
नाशिक आणि संगमनेरनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही भोंदूगिरीचे प्रकरण उघड झाल्याने अंधश्रद्धेचा विळखा किती खोलवर पसरला आहे, याची प्रचिती पुन्हा आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 सावधान! चमत्कार, अवतार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. कोणत्याही “बाबा” किंवा “मामां”च्या गोड बोलण्याला बळी पडण्याआधी कायदेशीर सल्ला घ्या — नाहीतर तुमचाही नंबर लागू शकतो!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default