ज्या शहराला आपण 'संस्कारांची नगरी' म्हणतो, त्याच नाशिकच्या ओद्योगिक क्षेत्रातून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नामांकित 'टीजीएस' (TCS) कंपनीत महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि बळजबरीने धर्मांतराचे जे रॅकेट उघड झाले आहे, त्यातील नवनवीन खुलासे पाहून माणुसकीलाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिरखुर्मा अन् थंड पेयातून 'विषाची' पेरणी
विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागलेले पुरावे डोळ्यात अंजन घालणारे आहेत. आरोपींनी केवळ वासनांध होऊन अत्याचार केले नाहीत, तर त्यामागे एक अत्यंत थंड डोक्याने आखलेले षडयंत्र होते. पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांना सणासुदीच्या नावाखाली 'शिरखुर्मा' आणि थंड पेयांमधून गुंगीचे औषध दिले जात होते. जेव्हा या महिला बेशुद्ध किंवा अर्धवट गुंगीत असत, तेव्हा त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले जात होते.
धर्मांतराचा 'विदेशी' खेळ; पैशांचा महापूर?
हे प्रकरण केवळ वैयक्तिक गुन्हेगारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, या पीडित महिलांचे केवळ शारीरिक शोषणच झाले नाही, तर त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडले जात होते. यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर 'फंडिंग' होत असल्याचा संशय SIT ने व्यक्त केला आहे. आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि गुंतागुंतीचे व्यवहार तपासले असता, तरुणींच्या धर्मांतरासाठी काही संशयास्पद रकमा जमा झाल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पसरलेले आहे का? याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे.
कायद्याचा बडगा: निदा खानचा जामीन फेटाळला
या संपूर्ण काळ्या कृत्याची मास्टरमाईंड मानली जाणारी मुख्य संशयित निदा एजाज खान हिचा पाय आता खोलात गेला आहे. नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडलेला युक्तिवाद आणि SIT ने सादर केलेले पुरावे इतके ठोस होते की, न्यायालयाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. सध्या निदा फरार असली, तरी पोलीस तिच्या मागावर आहेत.
कोठडीत वाढ; साखळी उघड होणार?
शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन या चार नराधमांच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हिच्यासह आसिफ अन्सारी आणि शफी शेख हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
संपादकीय टिप्पणी: कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचे अघोरी प्रकार घडत असताना व्यवस्थापन झोपले होते का? की त्यांचाही यात सहभाग आहे? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक पोलिसांनी आता या प्रकरणातील प्रत्येक धागा गांभीर्याने तपासण्याची गरज असून, अशा नराधमांना भरचौकात फाशी होईल असा खटला चालवणे हीच पीडित महिलांना खरी नाशिकमधील हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकटीत मर्यादित नसून समाजमन हादरवणारा प्रश्न बनला आहे. विश्वास, सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या कथित प्रकाराची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असली, तरी या घटनेने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

