मध्यंतरी राज्य सरकारने महापालिका वॉर्डांची हद्दवाढ केली. त्यात महापालिकांची वॉर्डसंख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने या निवडणुका वेळेत होणार की, मुदतवाढ मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सर्व पक्षांचे मत जाणून घेणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय होऊ शकतो. असे न झाल्यास नियोजितवेळेतच या निवडणुका होतील. गटांची फेररचना अजून जाहीर झालेली नाही
