दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑनलाईन घ्या या मागणीसाठई मुंबई, नागपूर, उस्मानाबाद यासपकह अनेक ठिकाणी आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेसंबंधी काही सूचना असतील तर त्या शिक्षण विभागाला कराव्यात. सरकार या संबंधी चर्चेसाठी तयार आहे. परंतु अशा पद्धतीने मुलांना कोणी रस्त्यावर उतरवू नये.
मुलांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करू नये, सरकार चर्चेसाठी तयार; वर्षा गायकवाड यांचं आवाहन
मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२
0
शाळेतील मुलं दोन आघाड्यावर लढत आहेत, एकीकडे कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे दोन वर्षांपासून शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी. असं असताना आता मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल तर ती राज्य सरकारशी करावी असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
Tags
