नवरी म्हटलं की गालातल्या गालात हसणारी, लाजणारी, हळूच नजर वर करून पाहणारी. भले महिला कितीही बिनधास्त असली तरी आपल्या लग्नात मात्र खोटंखोटं हा होईना पण सलग चेहऱ्यावर हास्य ठेवावं लागतं आणि लाजत राहावं लागतं. असंच खोटं लाजून एक नवरीबाई इतकी वैतागली की बंद खोलीत येऊन तिने आपली लाजच सोडून दिली असं म्हणायला हरकत नाही.
लग्नात सर्व पाहुण्यांसमोर लाजणारी नवरी एका बंद खोलीत आली आणि त्यानंतर तिने असं काही केलं की तुम्हीही हैराण व्हाल. कॅमेरा ऑन करून तिने कॅमेऱ्यासमोरच जे काही करायचं ते केलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. brides_special नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही लाजणाऱ्या नवरीची पोझ देऊन थकता आणि नंतर तेसुद्धा तुम्हाला शक्य होत नाही, असं कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आलं आहे.
